करोनाने आपल्या देशाची परीक्षा पाहिलीय. या संकटकाळात आपल्याला दहा महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले!
शब्दांच्या निवडीबाबत सतर्क असण्याची गरज आहे. ‘आत्मनिर्भर’ हा शब्द करोनाच्या काळात पुढे केला गेलेला निराशाजनक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे की, स्वावलंबी होणं (जे चांगलंच आहे) आणि स्वत:साठी पुरेसं होणं (जे वाईट आहे). पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर’ या शब्दाचा वापर दोन्ही अर्थांनी केला. जोपर्यंत ते देशीवाद सोडून देत नाहीत, तोवर भारताचं ‘पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनवण्याचं स्वप्नही अपुरंच राहील.......